पुष्पाताई गणिताच्या बाबतीत ‘अन-अ‍ॅपोलोजेटिकली प्यूरिस्ट’ असाव्यात. त्यांचा गणिताकडे बघण्याचा दृष्टिकोन ‘गणितासाठी गणित, रिगरसाठी-कसासाठी गणित, बौद्धिक आव्हानासाठी गणित’ असा असावा

पुष्पाताईंच्या बोलण्यातले विराम अर्थपूर्ण असत. आपल्याला काय वाटतं किंवा म्हणायचं आहे, हे स्पष्ट होईपर्यंत त्या थांबत असाव्यात. आपल्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत किंवा असायला पाहिजेत, असाही त्यांचा आग्रह नसे, असं मागे बघताना वाटतं. पुष्पाताईंनी आम्हाला अर्थातच गणित शिकवलं. माझ्यासकट अनेकांना आपण बारावीत गणितात पास होऊ शकतो, इथपासून ते आपल्याला गणित(सुद्धा) समजू शकतं इथपर्यंत आत्मविश्वास दिला.......

मराठीच्या अभिजातत्वाची मांडणी साधार आणि निर्दोष असावी : अभिजात मराठी भाषा समिती अहवाल २०१३ आणि संबद्ध चर्चेच्या निमित्तानं

मराठी भाषेला केंद्र शासनाचा अभिजात भाषेचा दर्जा मिळायला अजिबात विरोध नाही, पण अभिजातत्वाची मांडणी भाषाशास्त्राच्या शिस्तीनं खरे पुरावे आणि ग्राह्य प्रमाणं यांच्या आधारावर केली जाणं गरजेचं आहे. शंकास्पद मांडणी, सांगोवांगीच्या गोष्टी, आख्यायिका, दंतकथा, आणि विपर्यस्त किंवा अभिनिवेशपूर्ण भावनिक "पुरावे" हे मराठीच्या अभिजातत्वाचे आधार समजले गेले, तर त्यातून मराठी भाषेचं भलं होण्याची शक्यता नाही.......